Search This Blog

Tuesday 8 September 2020

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ई- आरमध्ये सादर करावी


सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची

त्रैमासिक माहिती नमुना ई- आरमध्ये सादर करावी

चंद्रपूर दि. 8 सप्टेंबर: जिल्ह्यातील आस्थापना कार्यालयात येऊन स्वतःची प्रोफाईल अद्यावत करून ईआर-1 भरून घेत आहे. परंतु अजूनही बऱ्याच आस्थापना येणे बाकी आहे. ज्या आस्थापनांनी अजून पर्यंत प्रोफाइल अद्यावत केलेले नसून ईआर-1 सुद्धा भरलेले नाही किंवा या बाबत त्यांना काही कळलेले नाही. अशा आस्थापनांनी कार्यालयात येऊन सदर प्रक्रिया समजावून घ्यावी व कार्यवाही पूर्ण करावी. तसेच 30 सप्टेंबर 2020 रोजी संपणाऱ्या तिमाहीचे ईआर-1 विवरणपत्र 1 ते 31 ऑक्टोबर  या कालावधीत ऑनलाईन भरावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा,1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय-निमशासकीयतसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री-पुरुष व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीसविषयाकिंत कायद्यातील तरतुदीनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com अथवा asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशिलासह संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment