Search This Blog

Wednesday 23 September 2020

माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना वैद्यकीय आर्थिक मदत



माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना वैद्यकीय आर्थिक मदत

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 23 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना माजी सैनिक अंशदान योजनाद्वारे आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा प्राप्त होणार आहे.या वैद्यकीय सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांनी माजी सैनिक अंशदान योजनेचे सदस्य बनने अनिवार्य आहेअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिपक लिमसे यांनी केले आहे.

यांना मिळणार लाभ:

दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेले लाभार्थीइमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसरशॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरसर्व माजी सैनिक आणि माजी सैनिक विधवा ज्यांना सैन्य सेवेचे निवृत्तीवेतन मिळत नाही अशांना वैद्यकीय सुविधा प्राप्त होणार आहेत.

या योजनेचे सदस्यत्व स्विकारण्याकरिता सविस्तर माहिती www.echs.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कल्याणकारी निधीमधून आतापर्यंत वैद्यकीय सुविधेसाठीची दिल्या जाणारी आर्थिक मदत दिनांक ऑक्टोबर 2020 पासून बंद करण्यात येत आहे.

00000 

No comments:

Post a Comment