Search This Blog

Friday 18 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 7279


 

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 7279

24 तासात 303 बाधिताची नोंद दहा बाधितांचा मृत्यू

4106 कोरोनातून बरे ;3068 वर उपचार सुरू

 

चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसारजिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 303 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 279 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 106 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 68 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येरामनगरचंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू पायली भटाळीताडोबा रोड चंद्रपुर येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू विचोडाचंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

सहावा मृत्यू महाकाली कॉलनी परिसरचंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 15  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

सातवा मृत्यू कळमनाबल्लारपूर  येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

आठवा मृत्यू भिवापूर वार्डचंद्रपूर  येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

नववा मृत्यू बालाजी वार्डचंद्रपूर  येथील 32 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, दहावा मृत्यू जटपुरा गेट परीसरचंद्रपूर  येथील 62 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 15  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या दहा मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 105 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 98तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 126कोरपना तालुक्यातील 12गोंडपिपरी तालुक्यातील 6,  नागभीड तालुक्यातील 3पोंभुर्णा तालुक्यातील 1बल्लारपूर तालुक्यातील 29 ब्रह्मपुरी तालुक्यातील 49भद्रावती तालुक्यातील 22मुल तालुक्यातील 15,  राजुरा तालुक्यातील 6वरोरा तालुक्यातील 18सावली तालुक्यातील 13सिंदेवाही तालुक्यातील 2,  वणी यवतमाळ येथील एक असे एकूण 303 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील एकता नगरबापट नगरबालाजी वार्डसरकार नगरकोतवाली वार्डजटपुरा गेट परिसरलक्ष्मी नगर वडगावरामनगरअजयपुरसम्राट अशोक नगरएकोरी वार्डभानापेठ वार्डजगन्नाथ बाबा नगरकृष्णा नगरइंदिरा नगरम्हाडा कॉलनी परिसरदादमहल वार्डऊर्जानगरसरकार नगरसमाधी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

राजुरा तालुक्यातील गांधी चौक परिसरचुनाभट्टी परिसरसास्तीकुरली परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील गांधी वार्डमहाराणा प्रताप वार्डबालाजी वार्डदादाभाई नौरोजी वार्डकन्नमवार चौक परिसरगौरक्षण वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातून विद्यानगरशेष नगरभिकेश्वरजानी वार्डकृष्णा कॉलनी परिसरखेडसौंदरीगांधी चौक परिसरपटेल नगरगांधिनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील गुरूनगरगणेश मंदिर परिसरनंदोरीराधाकृष्ण कॉलनी परिसर,गांधी चौकमाजरी  भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्डमाढेळीअभ्यंकर वार्डबावणे लेआऊट परिसरज्योतिबा फुले वार्डवैष्णवी नगरबोर्डामोहबाळापरिसरातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील चिरोलीपळसगावचिचाळावार्ड नंबर 17 मुल या भागातून बाधित ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment