Search This Blog

Friday 11 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 2827 बाधितांना डिस्चार्ज


 चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 2827 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 5253 ;

उपचार सुरु असणारे बाधित 2365

जिल्ह्यात 24 तासात 401 बाधित पाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 11 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 401 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 हजार 253 झाली आहे. यापैकी 2 हजार 827 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 365 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासांमध्ये 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये बालाजी वॉर्ड चंद्रपुर येथील 48 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 4 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह उच्च रक्तदाबमधुमेह तसेच न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यु सिस्टर कॉलनी चंद्रपूर येथील 42 वर्षीय महिला बाधितेचा आहे. 9 सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 11 सप्टेंबरला पहाटे बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तिसरा मृत्यु माजरीभद्रावती येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यु  बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तरपाचवा मृत्यु ब्रह्मपुरी येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 61 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 57तेलंगाणा एकबुलडाणा एक व गडचिरोली दोन बाधितांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 220कोरपना तालुक्यातील 12गोंडपिपरी तालुक्यातील तीनचिमूर तालुक्यातील 19नागभीड तालुक्यातील एकपोंभूर्णा तालुक्यातील 4बल्लारपूर तालुक्यातील 23ब्रह्मपुरी तालुक्यातील 32भद्रावती तालुक्यातील 16मूल तालुक्यातील 27राजुरा तालुक्यातील 20वरोरा तालुक्यातील 10सावली तालुक्यातील 2शिंदेवाही तालुक्यातील 8गडचिरोली येथून आलेले दोन तर उमरेड-नागपुर येथून आलेले दोन असे एकूण 401 बाधित पुढे आले आहे.

 

या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील गोपालपुरी बालाजी वार्डसरकार नगरकृष्णानगर केरला कॉलनी परिसरहनुमान चौकविठ्ठल मंदिर वार्डभिवापुर वॉर्डजटपुरा गेट परिसरसरकार नगरबाबुपेठ वार्डइंदिरा नगरजल नगर वार्डसराई वार्डपंचशील चौकघुगुसशेनगावगोरक्षण वार्डवडगावबापट नगरचव्हाण कॉलनी परिसररयतवारी कॅालरी परिसरदत्तनगरवाघोबा चौक तुकूमआंबेडकर चौक परिसरबिंनबा गेट परिसर भागातून बाधित पुढे आले आहे.

 

तालुक्‍यातील या ठिकाणी आढळले बाधीत:

ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगरशांतीनगरबरडकिन्हीकन्हाळगावसौंदरीसंत रविदास चौक परिसरदेलनवाडी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्डबालाजी  वार्डझाकीर हुसेन वार्डफुलसिंग नाईक वार्डगणपती वार्डबामणीबुद्ध नगर वार्डविद्यानगर वार्डटिळक वार्डपरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मूल तालुक्यातील चितेगावबोरचांदलीभागातून बाधित ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment