Search This Blog

Friday 25 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 5193 कोरोना मुक्त


 चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 5193 कोरोना मुक्त

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 8911

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3583

24 तासात 202 बाधित आले पुढेपाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 25 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 202 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 911 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 5 हजार 193 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 583 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, बाबुपेठचंद्रपूर येथील 61 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 2 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. 

दुसरा मृत्यू चंद्रपूर शहरातील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू बल्लारपूर येथील 42 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू सिस्टर कॉलनी परीसरचंद्रपूर येथील 42 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

तर, पाचवा मृत्यू  कोठारीबल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील पहिला मृत्यू झालेल्या बाधितेला कोरोनासह मधुमेह असल्याने क्राइस्ट हॉस्पिटल येथे मृत्यू झालेला आहे. तरअनुक्रमे दोन ते पाच मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 135 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 128तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 94 बाधितपोंभूर्णा तालुक्यातील 5, बल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 2, मूल तालुक्यातील 4, गोंडपिपरी तालुक्यातील 1, जिवती तालुक्यातील 1, कोरपना तालुक्यातील 4, ब्रह्मपुरी तालुक्यातील 20, नागभीड तालुक्यातील 7,  वरोरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 3, सावली तालुक्यातील 3,  सिंदेवाही तालुक्यातील 19, राजुरा तालुक्यातील 15, यवतमाळ येथील 2, तर गडचिरोली येथील एक असे एकूण 202  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परीसरातील ऊर्जानगररेल्वे कॉलनी परिसरबाजार वार्डसरकार नगरसिंधी कॉलनी परिसरस्नेह नगरवडगावघुग्घुससंजय नगरअशोक नगरकृष्णा नगरभिवापुर वॉर्डपठाणपुरा वार्डनगीनाबागभिवापूर वार्डसाळवे कॉलनी परिसरजल नगर वार्डसिस्टर कॉलनी परिसरसिद्धार्थ नगरभानापेठ वार्डछोटा बाजार परिसरबालाजी वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील शिव नगर वार्डटिळक वार्डगौरक्षण वार्डश्रीराम वार्डबालाजी वार्डपरिसरातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील  वडाळा पैकु परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील मारोडा परिसरातून बाधीत ठरले आहे. राजुरा तालुक्यातील रामपूरबामणवाडासोमनाथपूरगौरी कॉलनी परिसरसास्तीदोहेवाडी वार्डचुनाळाटिचर कॉलनी परिसरबाजार वार्ड भागातून बाधीत पुढे आले आहे.वरोरा तालुक्यातील निमसडाशेगावआशीर्वाद लेआऊट परिसरविवेकानंद वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील शिवाजी चौकझेंडा चौक तळोधीसुलेझरीगोविंदपुरराम मंदिर चौक परिसरचावडेश्वरी चौक भागातून बाधित पुढे आले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील पेठ वार्डभवानी वार्डमाहेर खरबीटिळक नगरशांती नगरपटेल नगरसंत रविदास चौक परिसरशेष नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील एसीडब्ल्यू कॉलनी परिसरनांदाफाटा भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगरगौतम नगरभोज वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील बामणीनवरगावपळसगावकाचेपारगजानन नगरसलीम नगरसुभाष वार्ड भागातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड भागातून बाधित ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment