Search This Blog

Wednesday 16 September 2020

शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

 


शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

चंद्रपूर,दि. 16 सप्टेंबर : महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्रचंद्रपूरद्वारे  10 वी  पास  व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता ऑनलाईन 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या सहा दिवस कालावधीचे शेतीवर आधारीत उद्योग,   प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित  करण्यात आले आहे.

       सदर प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारीत उद्योग संधी पशुधनावर आधारीत उद्योगसंधी यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल, उद्योगाचे व्यवस्थापन, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया, पशुधन, उद्योगाची निवड, शासनाच्या विविध योजनाची माहिती, संभाषण कौशल्य, बाजारपेठ पाहणी, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन इत्यादी विषयावर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक- युवतीनी  त्वरीत दि. 3 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रउद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208, बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोडचंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटाशाळा सोडल्याचा दाखलागुणपत्रिकाआधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड (मो.न. 9403078773, 07172-274416) व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो.नं. 94011667717),  लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.

000000

बांबू आर्टिकल्स प्रशिक्षण कार्यक्रम

युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 16 सप्टेंबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 5 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर  (दोन आठवडे ) कालावधीचे ऑनलाईन बांबू व बांबू आर्टिकल्स प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

प्रशिक्षणामध्ये बांबू पासून नाविन्यपूर्ण वस्तू निर्मिती करणे, उद्योगसंधी मार्गदर्शनशासनाच्या विविध योजनाची  माहिती, समस्यांचे निराकरण, संभाषण कौशल्यबाजारपेठ पाहणीकार्यप्रणालीयशप्राप्ती, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे  मार्गदर्शनकर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक-युवतींनी त्वरीत 3 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रउद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208, बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोडचंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटाशाळा सोडल्याचा दाखलागुणपत्रिकाआधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर राहावे. अधिक  माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड,  (मो.नं. 9403078773, 07172-274416) व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो. नं. 94011667717), लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment