Search This Blog

Thursday 10 September 2020

इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांचा मास्टर प्लॅन तयार करावा : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे



इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांचा मास्टर प्लॅन तयार करावा

: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील

गावांच्या अडचणी व उपाययोजना बाबत आढावा

चंद्रपूर दि. 10 सप्टेंबर: ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांमधील चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील 143 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश आहे. या प्रत्येक गावाचा झोनल मास्टर प्लॅन तसेच टुरीझम प्लॅन तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्यात.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील गावांच्या अडचणी व उपाययोजना बाबतचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य वनसंरक्षक एन.आर प्रवीण उपस्थित होते.

 

मास्टर प्लॅन तयार करताना प्रत्येक गावाचा आढावा घ्यावा

: मदत व पुनर्वसन मंत्री ना. वडेट्टीवार

ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील गावांच्या अडचणी व त्या संदर्भात उपायोजना वनविभागाने कराव्यात. त्याचबरोबर, या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावाचा काळजीपूर्वक आढावा घ्यावा. प्रत्येक गावाचा आढावा घेऊन झोनल मास्टर प्लॅन तयार करावा असे निर्देश पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांना दिलेत.

11 सप्टेंबर 2019 च्या सूचनेद्वारे 143 गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. दोन वर्षांमध्ये झोनल मास्टर प्लॅन तयार करावयाचे नियोजन आहे. त्यामुळे सर्व विभागाच्या संमतीने झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून टुरिझम मास्टर प्लॅन  तयार करण्याचे निर्देशही वनविभागाला देण्यात आले.

झोनल मास्टर प्लॅन संदर्भात समिती मार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून मान्यता मिळाल्यास सर्व्हेचे काम तातडीने सुरू करण्यात येणार अशी माहिती वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली.

00000000   

No comments:

Post a Comment