Search This Blog

Thursday 24 September 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 5051 बाधित कोरोनातून झाले बरे


 जिल्ह्यात आतापर्यंत 5051 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3528

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 8709 वर

24 तासात 210 नवीन बाधितसहा बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 24 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 210 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 8 हजार 709 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 51 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 528 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासात सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, घुटकाळा वार्डचंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू आनंदवन परीसरवरोरा येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू तुकूमचंद्रपुर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू आंबेडकर कॉलेज परिसरचंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू एकोरी वार्डचंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर,सहावा मृत्यू चिमढा,मुल येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. अनुक्रमे एक ते दोन मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.तरतीन ते सहा मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 130 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 123तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 80 बाधितपोंभूर्णा तालुक्यातील 1बल्लारपूर तालुक्यातील 33चिमूर तालुक्यातील 13,मूल तालुक्यातील 11गोंडपिपरी तालुक्यातील 5कोरपना तालुक्यातील 4ब्रह्मपुरी तालुक्यातील 4नागभीड तालुक्यातील 21,  वरोरा तालुक्यातील 14,भद्रावती तालुक्यातील 11सावली तालुक्यातील 1,  सिंदेवाही तालुक्यातील 2राजुरा तालुक्यातील 10 असे एकूण 210 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परीसरातील इंदिरानगररयतवारी कॉलनी परिसरबाबुपेठतूकूमनगीनाबागसमाधी वार्डसुमित्रा नगरघुग्घुसहनुमान नगरऊर्जानगरश्याम नगरशक्तिनगर दुर्गापुरभावसार चौक परिसरबालाजी वार्डवडगावगणेश नगरनेहरूनगरविठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बुद्ध नगर वार्डगोकुळ नगरकन्नमवार वार्डमहाराणा प्रताप वार्डगणपती वार्डझाकीर हुसेन वार्डडब्ल्यूसीएल कॉलनी परिसरविवेकानंद वार्डवैशाली चौक परिसरटिळक वार्डगौरक्षण वार्डविद्यानगरश्रीराम वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकुजांभुळघाटसोनेगावपिंपळनेरीगांधी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील चिमढावार्ड नंबर 4 परिसरातून बाधीत ठरले आहे. राजुरा तालुक्यातील दोगेवाडीसोमनाथपूर वार्डविवेकानंद नगरसास्ती कॉलनी परिसररामनगर,भागातून बाधीत पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील निमसडादहेगावसरदार पटेल वार्डहनुमान वार्डआझाद वार्डसर्वोदय नगरटिळक वार्डअभ्यंकर वार्डविद्यानगरीसुभाष वार्डपरिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील भगतसिंग चौक परिसरवलनी मेंढाविठ्ठल मंदिर चौक परिसरबाजार वार्डबाळापुरडोंगरगावप्रगती नगरमिंथूरतळोधीनवेगाव पांडव भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलपटलीपेठ वार्डगुजारी वार्डपरिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील एसीडब्ल्यू कॉलनी परिसर,  वार्ड नंबर 5शांती कॉलनी नांदा फाटा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील गौतम नगरविजासन रोड परिसरविश्वकर्मा नगरसाईनगरएकता नगरआंबेडकर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपारनवरगाव भागातून बाधित ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment