Search This Blog

Tuesday 8 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 2232 बाधितांना डिस्चार्ज


 चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 2232 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 4386 ;

उपचार सुरु असणारे बाधित 2103

जिल्ह्यात 24 तासात 331 बाधित तीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 8 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 331 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 हजार 386 झाली आहे. यापैकी 2 हजार 232 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 103 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये नेरी तालुका चिमूर येथील 55 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यु हा गांधी चौकगोंडपिपरी येथील 41 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 4 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 7 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तरतिसरा मृत्यु माजरीभद्रावती येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 7 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 7 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 51 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 47, तेलंगाणा एकबुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 189, बल्लारपूर तालुक्यातील 50, ब्रह्मपुरी तालुक्यातील 27, वरोरा तालुक्यातील 14, सिंदेवाही तालुक्यातील 11, राजुरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 7, मूल तालुक्यातील 4, सावली तालुक्यातील 4, कोरपना तालुक्यातील 3, गोंडपिपरी तालुक्यातील 3, जिवती तालुक्यातील 2,  चिमूर तालुक्यातील एक व नागभीड तालुक्यातील एक तर वणी- यवतमाळ जिल्ह्यातील 3, गडचिरोली जिल्ह्यातील 2 असे एकूण 331 बाधित पुढे आले आहे.

चंद्रपूर शहर व परीसरातील नगीना बाग हिस्लॉप कॉलेज परिसरपठाणपुरा वॉर्डजगन्नाथ बाबा नगरसम्राट चौक घुटकाळा वार्डइंदिरानगर गायत्री चौकबंगाली कॅम्पमहाकुर्लाजल नगर वार्डअंचलेश्वर वार्डसमाधी वार्डहनुमान नगरबालाजी वार्डसिंधी कॉलनी परिसरचोर खिडकी परिसरभानापेठ वार्डरयतवारी कॉलनी परिसरपंचवटी लॉन परिसरगोकुळ गल्ली परिसरकोसाराजटपुरा वार्डरामनगरसाईनगर तुकुमभिवापूर वार्डबाबुपेठसरकार नगरनेहरूनगरबापट नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील कळमनाबालाजी वार्डरवींद्र नगरगोरक्षण वार्डपंडित दीनदयाल वार्डफुलसिंग नाईक वार्डगांधी वार्डविवेकानंद वार्डटिळक वार्डसरदार पटेल वार्डसंतोषीमाता वार्डनवी दहेलीश्रीराम वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील फॉरेस्ट कॉलनी परिसरलाडजसंत रविदास चौकविद्यानगर भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील गाडगे नगरसरदार पटेल वार्डबोर्डाएकार्जूनापावनाकुचना परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment