Search This Blog

Sunday 20 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7816


 

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7816

आतापर्यंत 4484 बाधित कोरोनातून बरे ;

3218 बाधितांवर उपचार सुरू

24 तासात 292 बाधितांची नोंदपाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 20 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात 292 नवीन बाधितांची नोंद झाली असून बाधितांची एकूण संख्या 7 हजार 816 पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोना बाधितांची आजारातून बरे होण्याची संख्या देखील वाढत आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 4 हजार 484 आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 218 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारगेल्या 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येतुकुमचंद्रपूर येथील 59 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू तुकुमचंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू वडगांवचंद्रपुर येथील 47 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर,पाचवा मृत्यू पंचशील चौकचंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. वरील अनुक्रमे एक ते चार मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. तरपाचव्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व न्युमोनिया असल्याने क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 114 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 107, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोनयवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 102 बाधितपोंभुर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील 18, चिमूर तालुक्यातील दोनमूल तालुक्यातील 20, गोंडपिपरी तालुक्यातील 8, कोरपना तालुक्यातील 13, ब्रह्मपुरी तालुक्यातील 31, नागभीड तालुक्यातील 24, वरोरा तालुक्यातील 20, भद्रावती तालुक्यातील 17, सावली तालुक्यातील 11, सिंदेवाही तालुक्यातील 9, राजुरा तालुक्यातील 13, हिंगणघाट व चामोर्शी तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण 292 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील नेहरूनगरबाजार वार्डख्रिश्चन कॉलनी परिसरनगीना बागभिवापुर वॉर्डबंगाली कॅम्प परिसरएकोरी वार्डरामनगरदुर्गापुरपठाणपुरा वार्डतुकूमबालाजी वार्डअष्टभुजा वार्डजगन्नाथ बाबा नगरबाबुपेठजल नगर वार्डघुटकाळा वार्डगंज वार्डविवेक नगर, भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

ब्रह्मपुरी तालुक्यातील पेठ वार्डविद्यानगरओम नगरख्रिस्तानंद चौक परिसरफुले नगरलुंबिनी नगरबालाजी वार्डगांधीनगरशेष नगरपटेल नगर,जानी वार्डप्रबुद्ध नगर या परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील ओमकार लेआउट परिसरगांधी चौक परिसरअहील्या देवी नगरपाटील नगर,  गुरु नगरभगतसिंग वार्ड ,माजरीबाजार वार्डसुदर्शन नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील तुकडोजी चौक परिसरगांधी चौक परिसरउपरवाहीगडचांदूरमाणिकगड कॉलनी परिसरशांती कॉलनी परिसर,शिवाजी चौक भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगावलोनवाही,भागातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजीनगररामपूरकामगार नगर वार्डसिंधीकुरलीबिरसा मुंडा नगरमाता मंदिर वार्डबाजार वार्डराजीव गांधी चौक परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील सामदाखेडी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील  चिनोराहनुमान वार्डसुभाष वार्डचरुरखटीपांढूर्णीभोपापुरअभ्यंकर वार्डसलीम नगर भागातून बाधित पुढे आले आहे.मूल तालुक्यातील वार्ड नं. 11, राजगडचिमढापरिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील पंडित दीनदयाल वार्डसरदार पटेल वार्डगणपती वार्डकोठारीशिवनी चोरश्रीराम वार्डबालाजी वार्ड ,बामणी भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील पार्डीपाहार्णी नवेगाव पांडवचिखल परसोडीमिंडाळातळोधीजीवनापूर परिसरातून बाधित ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment