Search This Blog

Sunday 6 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 3903 बाधित


 

चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 3903 बाधित

उपचार घेत असलेले 2007 बाधित

आतापर्यंत बरे झालेले 1850 बाधित

24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्हपाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 6 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात नव्याने 262 पॉझिटिव्ह आढळले असून एकूण बाधितांची संख्या 3 हजार 903 वर पोहोचली आहे. आतापर्यंत  1 हजार 850 बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 2007 बाधितांवर उपचार सुरू आहे.

गेल्या 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 46 झाली असून चंद्रपूर 42, तेलंगाना एकबुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे. 24 तासात मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमुर तालुक्यातील शिवरा येथील 40 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे.  या बाधिताला 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तसेचदुसरा मृत्यु 70 वर्षीय विकास नगर वरोरा येथील पुरुष बाधिताचा आहे. 1 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 5 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तिसरा मृत्यू हा 65 वर्षीय तुकुम चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा आहे. 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया आजार होता. 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर,चवथा मृत्यु केळझर तालुका मुल येथील 86 वर्षीय पुरूष बाधिताचा आहे. या बाधिताला 26 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने आज 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तर,पाचवा मृत्यु हा 90 वर्षीय दादमहल चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 5 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. आज 6 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातीस 143, सावली तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील 10, गोंडपिपरी तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 17, मूल तालुक्यातील 28, राजुरा तालुक्यातील 4, वरोरा तालुक्यातील 7, कोरपना तालुक्यातील 2, भद्रावती तालुक्यातील 17, पोंभूर्णा तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील 9, सिंदेवाही तालुक्यातील 3, चिमूर तालुक्यातील 7, जिवती तालुक्यातील एक तसेच इतर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातील वणी  येथील एकठाणे मुंबई  येथील एक तर चामोर्शी तालुक्यातून एक असे एकूण 262 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील वडगावबालाजी वार्डमहेश नगरगुरुद्वारा परिसरदेवई-गोविंदपुर तुकुममहाकाली वार्डबाजार वार्डकृष्णा टॉवरशिवनगर तुकूमजल नगर वार्ड मित्र नगर,रामनगरभानापेठ वार्डमहाकाली वार्डघुटकाळा वार्डगजानन बाबा नगरदाद महल वार्डसावरकर नगरभिवापुर वॉर्डछोटा बाजार परिसरहनुमान नगर तुकुमदाताळा रोड परिसरविठ्ठल मंदिर वार्डअंचलेश्वर गेट परिसरनगीनाबागवार्ड नंबर 1 दुर्गापुरगंज वार्डसिस्टर कॉलनी परिसरबालाजी वार्ड,बिनबा वार्डबाबुपेठ या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:

भद्रावती तालुक्यातील संताजी नगरगणपती वार्ड गौराळाभोज वार्डपाटाळामाजरी कॉलरी परिसरघोडपेठआंबेडकर वार्डशास्त्रीनगरएकता नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील सराफा लाईनजिजामाता वार्डबोर्डा भागातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील जनकापूरभिकेश्वरमिंडाळा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातून हनुमान नगरलाडजइंजिनिअरिंग कॉलनी परिसरबोरगावबेटाळातोरगावखरकाडाशेष नगरहनुमान नगरगांधीनगर भागातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर येथील रेल्वे वार्डबालाजी वार्डश्रीराम वार्डगोरक्षण वार्डआंबेडकर वार्डसरदार पटेल वार्ड  परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मूल तालुक्यातील दिघोरीमारोडाराजगडकेळझरचितेगांव या गावातून बाधित पुढे आले आहे.पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्दबोर्डा भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील तळोधी नाईकपोलिस क्वॉर्टर परिसरनेरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

000000

No comments:

Post a Comment