Search This Blog

Sunday 13 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 5858 वर


 

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 5858 वर

आतापर्यत 3261 कोरोनातून बरे ;

2526 बाधितांवर उपचार सुरू

24 तासात 290 बाधितांची नोंद पाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 13 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या 24 तासात 290 बाधित आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची  संख्या 5 हजार 858 झाली आहे. आतापर्यंत 3 हजार 261 बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या 2 हजार 526 बाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्येशिवाजी नगरखेड ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू बामणवाडा राजुरा येथील 52 वर्षीय महिला बाधितेचा  झाला आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू नगीना बागचंद्रपुर येथील 37 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 4 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यू वणी यवतमाळ येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 7 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 12 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तरपाचवा मृत्यू बिकली नागभिड येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनियाहृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 71 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 64, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर  शहर व परिसरातील 135, चिमूर तालुक्यातील 12, पोंभूर्णा तालुक्यातील 7, बल्लारपूर तालुक्यातील 33, ब्रह्मपुरी तालुक्यातील 23, भद्रावती तालुक्यातील 13, मूल तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 9, वरोरा तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील 17, सिंदेवाही तालुक्यातील 14, कोरपणा तालुक्यातील 2, गोंडपिपरी तालुक्यातील 3, नागभीड तालुक्यातील 6, वणी- यवतमाळवडसा-गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण 290 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.

या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील तुकूमवाघोबा चौकदुर्गापुरमारडारामनगररयतवारीअंचलेश्वर वार्डभानापेठजुनोनाजीएमसी परिसरबाबुपेठकपिल चौककोतवाली वार्डपठाणपुरा वार्डगंजवार्डमोरवाबालाजी वार्डवडगाव,‌ उत्तम नगरअशोक नगरबाजार वार्डभिवापूर वार्डश्याम नगरगणेश नगर तुकुमहनुमान मंदिर चौकबापट नगरविठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्‍यातील या ठिकाणी आढळले बाधीत:

ब्रह्मपुरी तालुक्यातील फुले नगरबालाजी वार्ड,  मालडोंगरीवाल्मिक नगरआवळगावसंताजी नगरगांगलवाडीविद्या नगरकमला नगर परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील निमगावव्याहाळ बुलोढोली भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील राजगडबोरचांदली भागातून बाधित ठरले आहेत.

वरोरा येथील पद्मालय नगरअभ्यंकर वार्डबोर्डापोलीस स्टेशन परिसरएकार्जूना परिसरातून बाधित ठरले आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द भागातून बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील सोमनाथ पुरचुनाभट्टी वार्डबामणवाडा परिसरातून बाधित ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील तलोधीराम मंदिर चौक भागातून बाधित पुढे आले आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्डविवेकानंद वार्डदादाभाई नौरोजी वार्डगांधी वार्डडॉ.झाकीर हुसेन वार्डमहाराणा प्रताप वार्डभागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपुरगुरुदेव वार्डगांधी वार्डनेहरू वार्ड भागातून बाधित पुढे आले आहेत.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. भद्रावती येथील पंचशील नगरएकता नगरनवीन सुमठाणा भागातून बाधित पुढे आले आहेत.

000000

No comments:

Post a Comment