Search This Blog

Thursday 17 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3836 बाधितांना डिस्चार्ज


 

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3836 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 6976

उपचार सुरु असणारे बाधित 3045

जिल्ह्यात 24 तासात 294 बाधित सहा बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 17 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294  बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 45 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारगेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येरयतवारी कॉलरीचंद्रपूर येथील 40 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू क्राईस्ट हॉस्पिटल परिसरचंद्रपुर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू टीचर कॉलनी परिसरचिमुर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यु बाबुपेठचंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनिया असल्याने  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

पाचवा मृत्यू अंबादेवी वार्डवरोरा येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनियाचा आजार असल्याने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

सहावा मृत्यू शेषनगर ब्रह्मपुरी येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनियाचा आजार असल्याने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 95 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 88, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 162 बाधितकोरपना तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 3, नागभीड तालुक्यातील 5, बल्लारपूर तालुक्यातील 38,  ब्रह्मपुरी तालुक्यातील 21, भद्रावती तालुक्यातील 18, मूल तालुक्यातील 3, राजुरा तालुक्यातील 8, वरोरा तालुक्‍यातील 8, सावली तालुक्यातील 8, सिंदेवाही तालुक्यातील 10, वडसा- गडचिरोलीगोंदिया येथील प्रत्येकी एक व नागपूर येथील 3 असे एकूण 294 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील महाकाली वार्डएसटी वर्कशॉप परिसरबाबुपेठमहाकाली कॉलनी परिसरमाता नगर चौकनिर्माण नगररयतवारी कॉलनी परिसरसुभाष नगर घुगुसनगीना बागसमाधी वार्डछत्रपती नगरशांतीनगरदादमहल वार्डरामनगरवडगावएकोरी वार्डचिंचाळामोरवाबंगाली कॅम्पतुळसी नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील गांधी वार्डसाई बाबा वार्डकन्नमवार वार्डविवेकानंद वार्डसरकार नगरसमता चौकजुनी दहेलीभागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरीशांतीनगरगांधी वार्डवडसाविद्यानगरगाडगे नगरटिळक नगरबालाजी वार्ड,  परिसरातून बाधित पुढे आले आहे.

भद्रावती तालुक्यातील अहील्यादेवी नगरगणेश मंदिर रोड परिसरगौतम नगर माजरीगणपती वार्ड गौराळाचैतन्य कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील जामसाळारत्नापूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment