Search This Blog

Monday 21 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8090


 

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8090

4627 कोरोनातून बरे ; 3345 वर उपचार सुरु

24 तासात नव्या 274 बाधितांची नोंद; चार बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 21 सप्टेंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 274 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 90 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 627 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 345 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, दुर्गापुर, चंद्रपूर येथील 83 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 14 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

दुसरा मृत्यू महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर येथील 65 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू घुग्घुस, चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

तर,चवथा मृत्यू  श्रीराम वार्ड, बल्लारपूर येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील चार मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 118 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 111, तेलंगाणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 2, यवतमाळ 3 बाधितांचा समावेश आहे

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 172 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील 6, मूल तालुक्यातील 8, गोंडपिपरी तालुक्यातील 4, कोरपना तालुक्यातील 11, ब्रह्मपुरी तालुक्यातील 33, नागभीड तालुक्यातील 15, वरोरा तालुक्यातील 1, भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील 1, सिंदेवाही तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 4 तर गडचिरोली येथून आलेला 1 असे एकूण 274 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

 चंद्रपूर शहरातील तुकूम, साईनगर, रामनगर, सिंधी कॉलनी परिसर, दादमहल वार्ड, बाजार वार्ड, ऊर्जानगर, विवेक नगर, गोपाल नगर, अरविंद नगर, बंगाली कॅम्प परिसर, भानापेठ वार्ड, बाबुपेठ, भिवापुर वॉर्ड, वडगाव, शिवनगर, लालपेठ कॉलनी परिसर, शास्त्रीनगर, इंदिरानगर, संजय नगर, घुगुस, लक्ष्मी नगर, समाधी वार्ड, त्रिमुर्ती नगर, मित्र नगर, माता नगर लालपेठ, बापट नगर, भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित: 

ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव, गांधिनगर, कुर्झा, रेणुका माता चौक परिसर, उदापूर , विद्यानगर, नरिम चौक, सुंदर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील विनायक नगर माजरी, पंचशील नगर, गांधी चौक परिसर, संताजी नगर, बाजार वार्ड , शिंदे कॉलनी परिसर , चैतन्य कॉलनी परिसर माजरी भागातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव, चिंधीमाल, परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसर, भवानी मंदिर अमलनाला, हनुमान मंदिर परिसर, गडचांदूर परिसरातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कनाडगाव भागातून बाधीत ठरले आहे.

000000

No comments:

Post a Comment