Search This Blog

Saturday 5 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1642 कोरोना मुक्त

 


चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1642 कोरोना मुक्त

बाधितांची संख्या पोहोचली 3641 वर

24 तासात 195 बाधित;  दोन बाधितांचा मृत्यू

उपचार घेत असणारे 1958 बाधित

चंद्रपूरदि. 5 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 641 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 642 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 1 हजार 958 बाधितांवर  उपचार सुरू आहे. नागरिकांनी दैनंदिन काम करतांना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावेवेळोवेळी हात साबणाने अथवा सॅनिटायजरने स्वच्छ करावे तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाला कळवा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारजिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये  रामनगर चंद्रपूर येथील 56 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे.  या बाधिताला 31 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  उपचारादरम्यान 4 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला आहे. तरदुसरा मृत्यु हा 76 वर्षीय गणेश नगरतुकूम चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा आहे. 3 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 4 सप्टेंबरला सायंकाळी बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 41 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 37तेलंगाणा एकबुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरात 24 तासात 95 बाधित पुढे आले आहेत. त्याचबरोबरसावली तालुक्यातील 29बल्लारपूर तालुक्यातील 17गोंडपिपरी तालुक्यातील 12ब्रह्मपुरी तालुक्यातील 9मूल तालुक्यातील 7राजुरा तालुक्यातील 7,वरोरा तालुक्यातील 3कोरपना तालुक्यातील 3भद्रावती तालुक्यातील 5पोंभूर्णा तालुक्यातील 5नागभीड तालुक्यातील दोन तर सिंदेवाही तालुक्यातील एक असे एकूण 195 बाधित पुढे आले आहे.

शहर व परिसरात या ठिकाणी आढळले बाधित:

चंद्रपूर शहरातील हिंग्लाज भवानी वार्डठक्कर कॉलनी परिसरबस स्टॉप परिसर,बाबुपेठ वार्डसमाधी वार्डसाईबाबा वार्डताडोबा मोहर्ली गावरामनगर पोलिस क्वॉटर तुकुमतुलसी नगर वडगावघुटकाळा वार्डनगीना बागहरिओम नगरवृंदावन नगरहवेली गार्डन परिसरविठ्ठल मंदिर वार्डबालाजी वार्डमहाकाली कॉलरी परिसरगंज वार्डदाताळा रोड परिसरस्नेह नगरगणेश नगर तुकुमऊर्जानगरनकोडादुर्गापुरयशवंतनगर पडोलीपोस्टल कॉलनीसाईकृपा नगरतुकडोजी नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:

मुल येथील वार्ड नंबर 11 तर तालुक्यातील नवेगावताडाळाराजगडनांदगाव गावातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाडकिसान नगरवाघोली भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील गोवरीनोकारीमाता मंदिर वार्डगौरी कॉलनी परिसरसोमनाथपूर वार्डजवाहर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्डदादाभाई नौरोजी वार्डविवेकानंद वार्डराणी लक्ष्मीबाई वार्डगौरक्षण वार्डकन्नमवार वार्डगोकुळ नगरपेपर मिल कॉलनी परिसर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील धाबावडोलीपरिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील सायवनसूर्य मंदिर वार्ड,ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातुन पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

00000

No comments:

Post a Comment