Search This Blog

Wednesday 23 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8499


 चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8499

24 तासात 210 बाधितांची नोंद दोन बाधितांचा मृत्यू

4901 कोरोनातून बरे ; 3474 वर उपचार सुरू

चंद्रपूर दि. 23 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 210 नवीन बाधितांची नोंद झाली असून कोरोना बांधितांची एकूण संख्या 8 हजार 499 झाली आहे. यापैकी 4 हजार 901 बाधित बरे झाले आहेत. तर 3 हजार 474 जण उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारगेल्या 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येघुटकाळाचंद्रपूर येथील 45 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

तर, दुसरा मृत्यू नेहरू नगरचंद्रपुर येथील 34 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. या दोन्ही मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 124 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 117, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 94, पोंभूर्णा तालुक्यातील 4, बल्लारपूर तालुक्यातील 13, चिमूर तालुक्यातील 22, मूल तालुक्यातील 12,  कोरपना तालुक्यातील 11, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, नागभीड तालुक्यातील 2,  भद्रावती तालुक्यातील 20,  सिंदेवाही तालुक्यातील 7, राजुरा तालुक्यातील 13 असे एकूण 210 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील हनुमान मंदिर परिसररामनगरजल नगर वार्डदुर्गापुरजटपुरा वॉर्डशिवनगर वडगाववृंदावन नगरएकोरी वार्डबाबुपेठशांतीनगरऊर्जानगरआयुष नगरसरकार नगर तुकूमसमाधी वार्डजगन्नाथ बाबा नगरबापट नगरपटेल नगरकोतवाली वार्डबुद्ध नगर वार्डपठाणपुरा वॉर्डसावरकर नगरसिंधी कॉलनी परिसरअंचलेश्वर वॉर्डशिवाजी चौक परिसरविवेक नगरभानापेठ वार्डगंज वार्डशास्त्रीनगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बामणीमहादवाडीनागाळारेल्वे वार्डटिळक वार्डफालसिंग नाईक वार्डसंतोषीमाता वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील रामपूर,पेठ वार्डविरूर रोड,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील गुरु नगरसंताजी नगरराम कृष्णा चौक परिसरशिवाजी वार्डगणपती वार्डगांधी चौक परिसरआंबेडकर वार्डगौराळामाजरीझाडे प्लॉट परिसरातून बाधीत ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूरमाणिकगड कॉलनी परिसरआवारपूरसुभाष नगरभागातून बाधीत पुढे आले आहे.

 

चिमूर तालुक्यातील नेहरू वार्डगांधी वार्डटिळक वार्डमाणिक नगरवडाळा पैकुशंकरपुरनेताजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मूल तालुक्यातील लक्ष्मीनारायण राईस मिल परिसरवार्ड नं. 16 परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गजानन नगरीगांधिनगररमाबाई चौक परिसरशेष नगररुक्मिणी नगर,खेडलुंबिनी नगर,कुर्झा भागातून बाधित पुढे आले.

00000

No comments:

Post a Comment