Search This Blog

Tuesday 8 September 2020

विकेल ते पिकेल धोरणावर मुख्यमंत्री साधनार शेतकऱ्यांशी संवाद


 

विकेल ते पिकेल धोरणावर मुख्यमंत्री साधनार शेतकऱ्यांशी संवाद

10 सप्टेंबरला विकेल ते पिकेल अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर दि.8 सप्टेंबर: विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दि. 10 सप्टेंबर  रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारकृषिमंत्री दादाजी भुसेफलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेकृषि राज्यमंत्री विश्वजीत कदमफलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरेकृषि सचिव एकनाथ डवलेपोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगीकृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकरीमहिला व नागरिकांनी  या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. कृषिमहसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेल (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoMवर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल.

विकेल ते पिकेल अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची सुरुवात करण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून  चिंतामुक्त  शेतकरी  व शेतकरी केंद्रित कृषि विकास यावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तरी सर्व शेतकरी बंधूनी वर दिलेल्या यु-टयुब लिंकव्दारे या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment