Search This Blog

Tuesday, 1 September 2020

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार

दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पुरग्रस्त भागाची करणार पाहणी

चंद्रपूर दि. 1 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार व 2 सप्टेंबर बुधवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करुन आढावा घेणार आहेत.

1 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे पुरपरिस्थिती बाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील पुरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

2 सप्टेंबर बुधवार रोजी  सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे त्यांचा वेळ राखीव असणार आहे. दुपारी 12:30 ब्रह्मपुरी वरून तालुका सावलीकडे प्रयाण करतील. दुपारी 1:30 वाजता सावली तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत पुरग्रस्त भागाची पाहणी करतील. सायंकाळी वाजता सावली तालुक्यातील व्याहाळ खुर्द येथे काँग्रेस कार्यालय येथे आगमन होणार असून पुर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता व्याहाळ खुर्द येथुन गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व पुर परिस्थिती बाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. रात्रीला शासकीय विश्रामगृहरानफुल निवास गडचिरोली येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

000000

No comments:

Post a Comment