Search This Blog

Monday 28 September 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 5690 बाधित कोरोनातून झाले बरे

 


जिल्ह्यात आतापर्यंत 5690 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3974

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 9812 वर

24 तासात 230 नवीन बाधितपाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 28 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 230 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 9 हजार 812 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 690 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 974 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येलाखांदूरभंडारा येथील 46 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू श्याम नगरचंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 22 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू बनवाहीनागभिड येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू  ब्रह्मपुरी येथील 70 वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरपाचवा मृत्यू चुनाभट्टीराजुरा येथील 74 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या सर्व मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 148 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 139, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीन,यवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 149 बाधितपोंभूर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील सातमुल तालुक्यातील 8, कोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 18,  वरोरा तालुक्यातील 13, भद्रावती तालुक्यातील पाचसावली तालुक्यातील 11,  सिंदेवाही तालुक्यातील 14, राजुरा तालुक्यातील दोन असे एकूण 230 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील बालाजी वार्ड, समाधी वार्ड, रेल्वे कॉलनी परिसरस्नेह नगरसुमित्रा नगरअंचलेश्वर वार्डमहेश नगरहॉस्पिटल वार्डजल नगरघुटकाळा वार्डरयतवारी कॉलनी परिसरगोपाल नगरबाबुपेठतुकूमऊर्जानगरदुर्गापुर ,पठाणपुरा वार्डसिव्हिल लाईन परिसरभिवापुर वॉर्डविठ्ठल मंदिर वार्डजटपुरा गेट परिसरसिद्धार्थ नगरसंजय नगरगंज वार्डओमकार नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील मानोराबामणीनेहरू वार्डटिळक वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील अमराई वार्ड भागातून बाधीत पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील सलिम नगरटिळक वार्डसरदार पटेल वार्डमालविय वॉर्डमोकाशी लेआऊट परिसरएकार्जूनाकृषी नगरअभ्यंकर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगरगुजरी वॉर्डपेठ वॉर्ड,  मेंढकीसंत रविदास चौक परिसरशेष नगर परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील गुरु नगरगजानन नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील  व्याहाडचकपरंजी  भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव भागातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment