Search This Blog

Saturday 19 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 4281 बाधितांना डिस्चार्ज


 

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 4281 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 7524

उपचार सुरु असणारे बाधित 3134

जिल्ह्यात 24 तासात 245 बाधित चार बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि.19 सप्टेंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसारजिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 245 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 524 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 281 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 134 बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकीहोम आयसोलेशनमध्ये 723 जण आहेत.

जिल्ह्यात  24 तासात 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येदादमहल वार्डचंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू बेळपाटळीब्रह्मपुरी येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू संजय नगरचंद्रपुर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरचवथा मृत्यू बंगाली कॅम्पचंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या चार मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 109 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 102, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोनयवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 103, पोंभुर्णा तालुक्यातील 4, बल्लारपूर तालुक्यातील 20, चिमूर तालुक्यातील 13, मूल तालुक्यातील 5गोंडपिपरी तालुक्यातील 4, कोरपना तालुक्यातील 21, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, नागभीड तालुक्यातील 8, वरोरा तालुक्यातील 5, भद्रावती तालुक्यातील 23, सावली तालुक्यातील 3, सिंदेवाही तालुक्यातील 8 तर राजुरा तालुक्यातील 16 असे एकूण 245 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील इंदिरानगर गायत्री चौक परिसरघुटकाळा वार्डजगन्नाथ बाबा नगरसिस्टर कॉलनी परिसररहमत नगरजुनोनाबुद्ध नगर नगीना बागशंकर नगरसाईबाबा वार्डप्रगती नगररयतवारी कॉलनी परिसरबंगाली कॅम्प परिसरजटपुरा गेट परिसरएकोरी वार्डबालाजी वार्डसमाधी वार्डबाबुपेठदुर्गापुरऊर्जानगरविवेकानंदनगरस्वस्तिक नगरवृंदावन नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्डराजेंद्रप्रसाद वार्डगणपती वार्डकन्नमवार महाराणा प्रताप वार्डश्रीराम वार्डपेपर मिल ओल्ड कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातून संत रविदास चौकशिवाजीनगर खेडगजानन नगरी,हलदा परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसरगणपती वार्ड गौराळासुर्या मंदिर वार्डआंबेडकर वार्डभोज वार्डताडाळी,ऊर्जाग्रामसुमठाणासुरक्षा नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील नांदाफाटानथ्थु कॉलनी परिसरशांती कॉलनी परिसरशिवाजी चौकहिरापूर भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील भासुलीखापरीटिळक वार्डवडाळा पैकुगांधी वार्डनेहरू वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगावनवेगाव पांडवभागातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील धोपटाळाविरूरलक्कडकोटजवाहरनगररामनगरहनुमान मंदिर परिसरराजीव गांधी चौकपेठ वार्डसास्ती परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील केसरवाहीपेठ गावपरिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.वरोरा तालुक्यातील चरूर खटीवैष्णवी नगरमाढेळी भागातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment