Search This Blog

Wednesday 9 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4662

 


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4662

24 तासात आणखी 276 बाधितदोन बाधितांचा मृत्यू

2364 बाधित कोरोनातून  झाले बरे;

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2245

चंद्रपूरदि. 9 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 276 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 662 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 245 असून आतापर्यंत 2 हजार 364 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगांव येथील 60 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 8 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तर दुसरा मृत्यु आझाद वार्ड वरोरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 2 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 8 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 53 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 49तेलंगाणा एकबुलडाणा एक आणि गडचिरोली बाधितांचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 136, राजुरा तालुक्यातील 6, वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9, भद्रावती तालुक्यातील 12, गोंडपिपरी तालुक्यातील 7, पोंभूर्णा तालुक्यातील 21, कोरपना तालुक्यातील 7, सावली तालुक्यातील 17 , मूल तालुक्यातील 21, नागभीड तालुक्यातील 2, चिमूर तालुक्यातील 9, ब्रह्मपुरी तालुक्यातील 14, सिंदेवाही तालुक्यातील तर वणी-यवतमाळ येथून आलेले बाधित असे एकूण 276 बाधित पुढे आले आहेत.

मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुकंणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई :

चंद्रपूर शहर महानगरपालिकानगरपरिषद, नगरपंचायत कार्यालय व गट विकास अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत कारवाई करत दिनांक सप्टेंबर पर्यंत मास्क न वापरणाऱ्या 14 हजार 666 व्यक्तींकडून 29 लक्ष 23 हजार 140 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 304 नागरिकांकडून 44 हजार 600 व इतर दंड  लक्ष 77 हजार 770 रुपयांचा असा एकूण  34 लक्ष 45 हजार 510 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

00000

No comments:

Post a Comment