Search This Blog

Tuesday 15 September 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा चंद्रपूरमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुभारंभ

 




माझे कुटुंबमाझी जबाबदारी मोहिमेचा चंद्रपूरमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुभारंभ

 

चंद्रपूरदि.15 सप्टेंबर  : कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात  'माझे कुटुंबमाझी जबाबदारीहि मोहीम राबविण्यात येत आहे.  कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंबमाझी जबाबदारीया मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर येथे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते  झाला.

यावेळी आमदार किशोर जोरगेवारआमदार सुभाष धोटे,  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरनिवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाडआयुक्त राजेश मोहीतेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोडअधिष्ठाता डॉ. एस.एन.मोरे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले कीकोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वतःहून स्वतःची व स्वतः च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. हा या मोहिमेचा  मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणेकोरोनाचे संशयित रुग्ण शोधणेउपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेहहृदयविकारकिडनी विकारलठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीत साधारणपणे दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात टप्याटप्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यात सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. संशयीतांची कोविड -19 चाचणी करण्यात येणार आहे. कोविड -19 बाबत प्रत्येक नागरिकाला  शिक्षित करणे तसेच संशयीत नागरिकांना त्वरित शोधणे व त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु करणे जेणेकरून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल. हा यामागील उद्देश असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

या मोहिमेदरम्यान नागरिकांना कोवीड नियंत्रणासाठी  शिकणे आजची गरज असून यासाठी काही नियम आणि मार्गदर्शक सूचना नागरिकांनी अंगीकारणे आवश्यक आहे. कुटुंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्य पाळताना अनावधानाने काही चुक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत. असे वडेट्टीवार म्हणाले.  नागरिकांनी आपापसात किमान 2 मीटरचे सुरक्षित अंतर ठेवावेमुखपटी अर्थात फेसमास्कचा कटाक्षाने वापर करावावारंवार हात स्वच्छ धुवावेतसेच निर्जंतुकीकरण द्राव्याचा योग्यरीत्या वापर करावा हि त्रिसुत्री  प्रत्येकाने पाळलीच पाहिजे.  याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात वैयक्तिक स्तरावरकौटुंबिक स्तरावरसोसायटी किंवा वसाहतीमध्येदुकानेमंड्यामॉल्स मध्ये खरेदीला जातानाप्रवास करताना या सर्व बाबी जिवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे असे वडेट्टीवार म्हणाले .

जोपर्यंत कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही तोपर्यंत या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असून जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नाना सहकार्य करा असे आवाहन वडेट्टीवार यांनी यावेळी  केले.

माझे कुटुंब,माझी जबाबदारी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा सेविकांना थर्मल स्क्रिनींग, पल्स ऑक्सीमीटर, सॅनीटायजर हे आरोग्य तपासणी साहित्य पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.

000000

No comments:

Post a Comment