पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
कोरोना विषयक घेणार आढावा बैठक
चंद्रपूर दि. 4 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 5 सप्टेंबर शनिवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 5 सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी 9 वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आगमन तर सकाळी 11.15 वाजता कोविड-19 संदर्भाने अधिकाऱ्यांसमवेत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील व दुपारी 2.30 वाजता कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे आगमन व राखीव असणार आहेत.
000000

No comments:
Post a Comment